नवोदय विद्यालयाच्या सहावी प्रवेशासाठी शनिवारी निवड चाचणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठी शनिवार, ३० एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता निवड चाचणी परीक्षा नियोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेस जिल्हयातील इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेल्या ११ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरुन नोंदणी केलेली आहे. सर्व परीक्षार्थ्यांनी आपले प्रवेश पत्र डाउनलोड करुन घ्यावेत व आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाची सही व शिक्का घेवून प्रवेशपत्र परिक्षेस येतांना घेवून यावे, यांची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालयाचे डॉ. आर.आर.खंडारे यांनी केले आहे.

सदर प्रवेशपत्र परीक्षे दरम्यान पर्यवेक्षक जमा करुन घेतील. जर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राची प्रत हवी असल्यास झेरॉक्स कॉपी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत ठेवावी. मुख्याध्यापकाची सही –शिक्का असलेले प्रवेशपत्र ३० एप्रिल २०२२ रोजी परीक्षा केंद्रावर जमा करणे अनिवार्य आहे, असेही त्यांनी कळविले आहे.

Protected Content