Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंदी भूषण जीवन गौरव पुरस्कारासाठी तीन सेवानिवृत्त शिक्षकांची निवड

अमळनेर –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुका हिंदी भूषण जीवन गौरव पुरस्कारासाठी तीन सेवानिवृत्त  हिंदी  शिक्षकांची निवड अमळनेर तालुका हिंदी अध्यापक कार्यकारणी मंडळाच्या बैठकीत करण्यात आली

 

अमळनेर तालुका हिंदी अध्यापक कार्यकारणी  मंडळाची नुकतीच हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सविचार सभा संपन्न झाली.  या सभेची सुरुवात  सत्यशोधक समाज संघटनेच्या स्थापनेस १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या बैठकीत अमळनेर तालुका हिंदी भूषण जीवन गौरव पुरस्कारासाठी तीन सेवानिवृत्त  हिंदी  शिक्षकांची निवड करण्यात आली. कोरोनामुळे राहिलेले दोन पुरस्कार आणि चालू वर्षाचा एक पुरस्कार असे तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत.

अमळनेर तालुका हिंदी भूषण जीवन गौरव पुरस्कारासाठी डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेर येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षिका भारती भांडारकर, जी. एस. हायस्कूल, अमळनेर येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षिका एन. आर. वानखेडे, स्व. आक्कासो कमलबाई विनायक पाटील सार्वजनिक विद्यालय, सारबेटे येथील सेवानिवृत्त हिंदी शिक्षक आर. के. निकम यांची निवड करण्यात आली.

यासोबतच हिंदी दिवस निमित्त शिक्षण विभाग पंचायत समिती अंमळनेर आणि अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत तालुक्यातील ४५ माध्यमिक शाळांमधून २६०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याबद्दल मुख्याध्यापक, हिंदी शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन करण्यात आले.  या सभेत तालुक्यातील हिंदी शिक्षक जे हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारसाठी,विद्यार्थ्यांमध्ये हिंदीभाषेची आवड निर्माण करण्यासाठी, हिंदी विषयासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करतात अशा हिंदी शिक्षकांना कृतिशील हिंदी अध्यापक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासोबतच हिंदी अध्यापक मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन यांची माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रसिद्ध प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच हिंदी मंडळाचे सचिव दिलीप पाटील व हिंदी मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे यांना हिंदी दिवस निमित्त अनुक्रमे सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूल,अमळनेर आणि महाराज सयाजी गायकवाड कॉलेज,मालेगाव येथे व्याख्याता म्हणून निमंत्रित केल्याबद्दल त्यांचा हिंदी मंडळाच्यावतीने शशिकांत आढाव व  कविता मनोरे यांनी पुस्तक आणि बुके देऊन सत्कार केला.

या सहविचार सभेत हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इन्सुलकर, सचिव दिलीप पाटील,   मार्गदर्शक व माजी अध्यक्ष दीपक पवार, मार्गदर्शक सोपान भवरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीष उघडे व नारायण चौधरी, सहसचिव कमलाकर संदानशिव, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख ईश्वर महाजन, प्रतियोगिता समिती सदस्य मुनाफ तडवी व प्रदीप चौधरी, ज्येष्ठ सदस्य डॉ. किरण निकम,सदस्य कविता मनोरे, योगेश्री पाटील, प्रतिभा जाधव, प्रशांत वंजारी, मंगला चव्हाण, जितेंद्र बाविस्कर यांची उपस्थिती होती.

या सभा यशस्वीतेसाठी महात्मा फुले हायस्कूल, धरणगावचे शिक्षक शशिकांत आढावे आणि  कविता मनोरे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार सचिव दिलीप पाटील यांनी व्यक्त केले. तालुकास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या सत्रातच  घेण्याचे नियोजन करू यासाठी हिंदी अध्यापक मंडळ प्रयत्नशील राहील अशी ग्वाही मंडळ अध्यक्ष आशिष शिंदे व उपाध्यक्ष  ज्ञानेश्वर इन्सुलकर यांनी दिली.

Exit mobile version