सुविकांत वाघची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

शेंदुर्णी प्रतिनिधी । स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी माध्यमिक व  उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी सुविकांत वाघ (इ.6वी) याने केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत यश संपादन केले असून त्याची साकेगाव येथील शासकीय जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली आहे.

सुविकांत याच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार ईश्वर जैन, सचिव माजी आमदार मनिष जैन, समन्वयक प्रा. अतुल साबद्रा, मुख्याध्यापक खलचे, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख व्ही.के.वाघ, वरिष्ठ लिपिक सुनील कुलकर्णी यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

Protected Content