Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवी दिल्ली येथील संसद भवन कार्यशाळेसाठी सरपंच स्वरा पाटील यांची निवड

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नवी दिल्ली येथील संसद भवन येथे एकदिवसीय कार्यशाळे करीत विवरे खु येथील सरपंच स्वरा पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली तर्फे २०२१/२२ “ती बदल घडविणारी आहे” या उपक्रम साठी महिला लोकप्रतिनिधीच्या सक्षमता वृध्दी करीता राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा पुणे यांचे मार्फत आयोजन केले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात नागरी व ग्रामीण स्तरावरील महिला लोकप्रतिनिधीनी सहभाग घेतला होता, त्यातून येत्या 5 जानेवारी 2024 रोजी संसद भवन नवी दिल्ली येथे होणाऱ्या एकदिवसीय कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातून एकमेव विवरे खु. येथील महिला सरपंच स्वरा संदीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवड बद्दल त्यांना तालुका भरातून शुभेच्छा येत आहे.

Exit mobile version