Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड

जळगाव प्रतिनिधी | शहरातील ‘कॉग्निझंट टेक्नोलॉजी, आयसीआयसीआय बँक, अॅटोस ग्लोबल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.

जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविदयालयाच्या ‘ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग’ विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर भर देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याची भूमिका बजावत असते याच अनुषंगाने कॉग्निझंट टेक्नोलॉजी, आयसीआयसीआय बँक, अॅटोस ग्लोबल या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे. अशी माहिती रायसोनी बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्युत अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा .बिपासा पात्रा यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेत निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून महाविद्यालयाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील तेजस महाजन, मृणालिनी वानखेडे, स्वाती गवळी, पराग पाटील, विशाखा बाविस्कर या पाच विद्यार्थ्यांची निवड केली. लॉकडाऊनच्या काळातही रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यानी ऑनलाईन मुलाखती घेतल्या व पात्र विद्यार्थ्यांची निवड केली.
सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा.तन्मय भाले, ऑफिसर प्रा.हर्षद पाटील, प्रा.मनीष महाले, प्रा.नेमीचंद सैनी यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले़.

 

Exit mobile version