Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे विविध कंपनीच्या मुलाखतीत निवड

जळगाव प्रतिनिधी । शहरातील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंट महाविदयालयाच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात अत्यंत महत्वाची भुमिका बजावत असते. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध कंपनीच्या मुलाखतीत भरघोस यश संपादन केले. 

अंतिम वर्षातील एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीए यातील सर्वच विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. निवड प्रक्रियेतील काही विद्यार्थ्यांच्या प्राथमिक चाचणी नंतर मुलाखती संबंधित कंपनीत घेण्यात आले  यात एचडीएफसी बँकेत दिपक वालेचा, भरत ओझा, इसाफ स्मॉल फायनान्समध्ये पियुष हसवाणी, कपिल चंदीरामाणी, मोनेटा ग्लोबल येथे शारिक मो., प्रहर्षा पाटील, नम्रता चौधरी, बैजुज येथे पायल लड्ढा, टीसीएस कंपनीत गौरव रायसोनी तसेच इ क्लर्कस मध्ये शुभम वानले, हमिंग बर्ड सोल्युशन यात निकिता वाधवा, रोहित पाटील, ओल स्क्रिप्ट येथे प्रतीक अहिरे यासह अनेक विद्यार्थ्यांची आदि नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. 

यावेळी रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी  रायसोनी समूहातील विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांची भटकंती होऊ नये. त्यामुळे रायसोनीत शिक्षण घेणारे तथा पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना यशस्वी करण्याचा पूर्ण प्रयत्न इस्टिट्यूट करीत असते. विद्यार्थ्यांचे चाचणी कौशल्य, मुलाखत कौशल्य, संभाषण कौशल्य उत्तम असावे यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येते. एकंदरीत सर्वांगीण विकासावर काम केले जाते असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व मॅनेजमट विभागाचे डीन प्रा. डॉ. मकरंद वाट  यांनी अभिनंदन केले़. तर ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version