प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत प्रलंबित मागण्याबाबत निवदेन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत प्रलंबित डाटा दुरुस्तीसाठी शिबीर आयोजित करणे, योजनेतील लाभार्थ्यांचे भौतिक तपासणी करणे व अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून दिलेला लाभ वसुल करण्याबाबतचे निवेदन आज यावल तालुका ग्रामसेवक युनियन (डीएमई१३६) तर्फे तहसीलदार महेश पवार आणि यावल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड (बोरसे ) यांना देण्यात आले आहे.

या दिलेल्या निवेदनात ग्रामसेवक युनियन तालुका यावल यांनी म्हटले आहे कि , महाराष्ट्रतील ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसेवक संवर्ग१३५योजना राबवित असुन संपुर्ण योजनेचे उद्धीष्ट हे मार्च व एप्रिल महिन्यात करव्याचे असते, तसेच राज्यात ग्रामपंचायत स्तरावर प्राप्त निधीचे खर्चाचे नियोजन करून भौतिकदृष्टया संपुर्ण कामे पुर्ण करावयाची आहेत.

सदरच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामसेवक संवर्गाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनाची कामे शक्य नाही तसेच संबंधीत विभागाकडे सध्या ग्रामसेवकांकडील कामांचा व्याप पाहता तसेच यापुर्वी आम्ही सदरच्या योजनेचे काम मोठया प्रमाणात केले असुन यापुढे करणार नाहीत असे निवेदनात म्हटले असुन ग्रामसेवकांकडील वाढलेल्या कामांच्या व्यापाचा आपण सहानुभुतीपुर्वक विचार करावा असे म्हटले आहे.

यावल येथे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनशी सलग्न यावल तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पुरुषोत्तम व्ही तळेले , सहसचिव हितेन्द्र महाजन, ग्रामसेवक सदस्य गुरूदास चौधरी यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यावल निवेदन सादर केले .

 

Protected Content