Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरच्या जयेश व कृष्णाची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड ….

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील जयेश धनगर आणि कृष्णा महाजन यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

नुकतीच ४९ वी कुमार गट राज्य अजिंक्य पद व निवड चाचणी खो खो स्पर्धा सातपुडा शिक्षण प्रसारण मंडळ वसंतराव नाईक महाविदयालय क्रीडांगण शहादा जि.नंदुरबार येथे होत आहे. या स्पर्धासाठी खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी एस हायस्कुल अमळनेर च्या जयेश गुलाब धनगर व कृष्णा संजय महाजन या दोघांची निवड राज्यस्तरिय खो खो स्पर्धासाठी झाली आहे. सदर स्पर्धा साठी जळगाव जिल्हा संघ आज रवाना झाला. या राज्यस्तरिय स्पर्धेमधुन राष्ट्रीय स्पर्धा चा महाराष्ट्र संघ निवडला जाईल.

दरम्यान, स्पर्धेसाठी निवड झालेल्या दोन्ही खेळांडुना सन्मानचिन्ह देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग रविंद नाईक व अमळनेर तालुका क्रीडा अधिकारी जगदिश चौधरी यांच्या शुभ हस्ते सत्कांर करण्यात आला.या खेळाडूंना खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डा.अनिल शिंदे , सर्व संचालक मंडळ,शालेय समिती चेअरमन आण्णासो हरी भिका वाणी ,जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक , तालुका क्रीडा अधिकारी जगदिश चौधरी , मुख्याध्यापक आबासाहेब बी एस पाटील,क्रीडा संघटनेचे कार्याध्यक्ष पत्रकार संजय पाटील,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकात सोनवणे , छत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ, उपमुख्याध्यापक नानासाहेब सी. एस. पाटील , राज्य सहसचिव जयांशु पोळ, पर्यवेक्षक एस. बी. निकम, शिक्षक प्रतिनीधी ए. डी. भदाणे , जिल्हा सचिव राहुल पोळ, जेष्ठ शिक्षक डी. एम. दाभाडे, शिक्षकेतर कर्मचारी प्रमुख एस. एम. पवार; एस. आर. शिंगाणे , सी. एस. सोनजे, के. पी. पाटील यांनी अभिनंदन करुन राज्यस्तरिय स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या .
वरिल खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख एस. पी. वाघ व के आर बाविस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version