नामांकित कंपनीत विद्यापीठाच्या केमीकल सायन्सचे चार विद्यार्थ्यांची निवड

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित ऑनलाईन परिसर मुलाखतीमधून अंकलेश्वर येथील भारतीय बहुराष्ट्र्रीय युपीएल लिमिटेड हया नामांकित कंपनीत विद्यापीठाच्या केमिकल सायन्सेस प्रशाळेच्या चार विद्यार्थ्यांची आज निवड झाली आहे. 

विद्यापीठाच्या  केंद्रिय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षा अंतर्गत नियमित परिसर मुलाखतींचे आयोजन करुन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिले. या उपक्रमांतर्गत अंकलेश्वर येथील भारतीय बहुराष्ट्र्रीय युपीएल लिमिटेड हया नामांकित कंपनीच्या परिसर मुलाखतींचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.  निवड प्रक्रीयेत सुरुवातीस विद्यापीठ प्रशाळातील स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या एम.एस्सीच्या अठठावीस  विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. 

यातून 08 विद्यार्थीची ऑनलाइन मुलाखत घेण्यासाठी निवड करण्यात आली. अंतिमत: राहुल पाटील, निलेश ठाकूर, अविनाश मोरे आणि मोहिनी झांबरे  हया विद्यार्थ्यांची संशोधन आणि विकास विभागाकरीता निवड करण्यात आली. या ऑनलाइन मुलाखती घेण्यासाठी कंपनीचे सिनियर जनरल मॅनेजर श्री राजन रमाकांत शिरसाळ, डेप्युटी जनरल मॅनेजर श्री विकास ओलतीकर आणि मनुष्यबळ व्यवस्थापक श्चेता रानी हे उपस्थित होते. यावेळी  केंद्रिय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक डॉ. भुषण चौधरी, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या प्रा.डॉ रत्नमाला बेंद्रे व डॉ अमरदीप पाटील यांनी सहकार्य केले. कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील,  प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही.पवार व केमिकल सायन्सेसचे संचालक प्रा.धनंजय मोरे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

Protected Content