Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर न.पा.च्या चार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड

 

फैजपूर (प्रतिनिधी) येथील नगर पालिकेच्या आज (दि.१५) झालेल्या विशेष सभेत चार समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. या विशेष सभेचे आयोजन पालिकेच्या सभागृहात सकाळी ११.०० वाजता करण्यात आले होते.

 

यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. महानंदा होले होत्या. या सभेत शालेय शिक्षण समिती सभापतीपदी शेख कुर्बान, सदस्य म्हणून मिलिंद वाघूळदे, हेमराज चौधरी, देवेंद्र बेंडाळे, शिक्षण समिती :- सभापती शकुंतला भारंबे, सदस्य सौ अमिता चौधरी, कलीम खा मण्यार, नफिसा बी शेख इरफान, मागासवर्गीय कल्याण समिती :– सभापती- देवेंद्र साळी, सदस्य डॉ इमरान शेख, शाहीन परवीन शकील खान, वत्सलाबाई कुंभार अशी समिती सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच वृक्षप्राधिकरण समितीच्या पदसिध्द सभापती म्हणून नगराध्यक्षा सौ. महानंदा होले व या समितीचे सदस्य निवड झालेले नागरिक असतील. या निवडी प्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, तर सभेला भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, काँग्रेस गटनेता कलीम खान मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक हेमराज चौधरी यांच्यासह सगळे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. विषय पत्रिकेचे वाचन पालिका बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे यांनी केले तर सभेचे कामकाज सहाय्यक कार्यालय निरीक्षक संतोष वाणी यांनी पाहिले.

Exit mobile version