Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याच्या खेळाडूंची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन द्वारा चौथी नॅशनल योगासन स्पोर्टस चॅम्पियनशिप येत्या काही काळात आयोजित होणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय योगासन संघाची निवड हि राज्य योगासन स्पर्धेतून केली जाणार आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपली जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेतून राज्य संघात निवड करण्यासाठी जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा दि. २२ जुलै २०२३ शनिवार रोजी सोहम योग विभाग  मू. जे. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

 

सदर स्पर्धा सब ज्युनियर गट वय वर्ष ९ ते १४, ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ आणि सीनियर गट वय  वर्ष १८ ते २८ मुल व मुली  तसेच या वर्षी नवीन समाविष्ट झालेले नवीन गट म्हणजे सिनिअर ‘अ ’गट २८ ते ३५  सिनिअर ‘ब’ गट ३५ ते ४५ आणि सिनिअर ‘ क’ गटात ४५ ते ५५ महिला व पुरुष  अशा एकूण सहा गटांमध्ये स्पर्धा  आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष पदी मू. जे. महाविद्यायलायाचे प्राचार्य डॉ.सं. ना. भारंबे, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचाकल डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर,  सोहम योग विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार तसेच जामनेर तालुका योगासन असोसिएशन चे प्रतीनधी निलेश वाघ हे उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाला व्यासपिठावर अध्यक्ष पदी के. सी. ई. सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र योगासन असोसिएशन चे टेक्निकल डारेक्टर तथा जळगाव जिल्हा असोसिएशन चे अध्यक्ष सतीश मोहगावकर तसेच सोहम योग विभाग संचालक डॉ. देवानंद सोनार तसेच जामनेर तालुका योगासन असोसिएशनचे प्रतिनिधी निलेश वाघ, जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशनचे सचिव प्रा. पंकज खाजबागे उपस्थित होते. त्यामध्ये खालील विविध  गटातील खेळाडूंची निवड करण्यात आली.

 

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्याना यावेळी प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी  तांत्रिक समितीमध्ये प्रा.अनंत महाजन, प्रा. गीतांजली भंगाळे , प्रा. ज्योती वाघ, गौरव जोशी, वासुदेव चौधरी, राहुल खरात, डॉ. शरयू विसपुते, साहिल तडवी, स्मिता बुरकुल, प्रकाश राठोड , विवेक चौधरी, हर्षा वर्मा  यांनी कार्यभार  सांभाळला.  स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे सचिव प्रा. पंकज खाजबागे, कोषाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सदस्य श्री. निलेश वाघ इतर सर्व पदाधिकारी,  सोहम योग चे सर्व प्राध्यापक आणि आजी माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज खाजबागे यांनी केले तर आभार डॉ. देवानंद सोनार  यांनी व्यक्त केले. शांतीपाठ करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Exit mobile version