Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रताप महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । प्रताप महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील बीएससी/एमएससी अंतिम वर्षातील १५ विद्यार्थ्यांची ऑफ-कॅम्पस ड्राइव्हद्वारे विविध बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

सदर विद्यार्थांना उत्तम वार्षिक पगारासोबतच आकर्षक सुविधा देखील पुरविली जाणार आहे. तसेच विप्रो सोफ्टवेयर कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीमार्फत पदव्युत्तर (एम.टेक ) शिक्षणासाठी  देखील संधी उपलब्ध होणार आहे. प्रताप महाविद्यालयासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

निवड झालेल्या विद्यार्थांची नावे पुढीलप्रमाणे 

वैष्णवी अनिल साळुंखे हिची विप्रो लिमिटेड या कंपनीमध्ये असिस्टंट इंजिनिअर म्हणून तर धनश्री शेंडे हिची टीसीएस या कंपनीमध्ये सीस्टम ऑडमिनीस्टेटर म्हणून निवड झाली. तसेच कमलेश महाजन, संजना भंडारी, वैशाली पाटील व करिष्मा पाटील या विद्यार्थ्यांची टीसीएस मध्ये असिस्टंट सीस्टम इंजिनिअर म्हणून निवड करण्यात आली. रुपेश ठाकूर, नेहा न्हावी, रितेश जैन, भावेश महाजन, भूषण सोनवणे यांची विप्रो लिमिटेडमध्ये  स्कॉलर ट्रेनी म्हणून निवड झाली आहे. अश्विनी भदाणे या विद्यार्थिनीची टीसीएस या कंपनीमध्ये ग्राजुएट  ट्रेनी तर अनुष्का ठाकरे हिची एमफासीस या कंपनीमध्ये ट्रेनी असोसियेट सॉफ्टवेयर  म्हणून निवड करण्यात आली. गौरव पाटील व  विशाल पाटील यांची कॅपजेमिनी मध्ये ग्राजुएट ट्रेनी म्हणून निवड झाली आहे.

सदर कॅम्पस ड्राईव्ह ऑनलाईन प्रणालीद्वारे घेण्यात आला. या नियुक्तीबद्दल खा.शि. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर.शिरोडे, उपप्राचार्य डॉ. एम.एस.वाघ,उपप्राचार्य डॉ.जी.एच.निकुंभ, उपप्राचार्या डॉ.कल्पना पाटील, उपप्राचार्य डॉ. जे.बी .पटवर्धन , आयक्यूएसी(IQAC)चे समन्वयक डॉ. जयेश गुजराथी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सदर कॅम्पस ड्राईव्हसाठी विविध स्तरावर विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. पुष्पा पाटील, प्रा. नेहा आगलावे यांनी मार्गदर्शन केले. तसेच  प्रा.ए.एन. शिंदे, प्रा. तृप्ती चौधरी, प्रा.वैष्णवी साळुंखे, प्रा. भाग्यश्री सपकाळे, प्रा.नम्रता बडगुजर, प्रा. श्वेता पाटील, प्रा. किरण बोरसे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

Exit mobile version