Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात कर चुकवून आणलेला सिगारेटचा साठा जप्त

sigaret

जळगाव (प्रतिनिधी) शासनाचा कर चुकवून लाखो रुपये किंमतीच्या विदेशी बनावटीच्या सिगारेट विक्रीसाठी आणल्याप्रकरणी शहरातील तिजोरी गल्लीत दोन पानमसाल्याच्या होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. आयएनटी काउंटर कीट अव्हेनर्स फाउंडेशन (एनजीओ) आणि शहर पोलिसांनी संयुक्तरित्या आज दुपारी ओम साई ट्रेडर्स आणि आशीर्वाद ट्रेडर्सवर ही कारवाई केली.

 

 

या संदर्भात अधिक असे की, शहरातील तिजोरी गल्लीत असणा-या ओम साई ट्रेडर्स आणि आशीर्वाद ट्रेडर्समध्ये अवैधरित्या शासनाचा कर चुकवून लाखो रुपये किंमतीच्या विदेशी बनावटीच्या सिगारेट विक्री केल्या जात असल्याच्या माहिती आएनटी काउंटर किट अवेहर्नर्सफाउंडेशन (एनजीओ)चे प्रतिनिधी अनिल मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आज शहर पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार पीएसआय मीना तडवी, एएसआय वासुदेवसोनवणे, विजय निकुंभ,बशीर तडवी, अक्रम शेख, रतन गीते, योगेश सपकाळे आदींच्या पथकाने आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास धाड टाकली.

 

यावेळी साधारण साडेतीन लाख रुपये किंमतीच्या गुदम गरम व ब्लॅक या विदेशी बनावटीच्या सिगारेटचा साठा आढळून आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, शहर पोलीस स्थानकात ओम साईट्रेडर्स आणि आशीर्वाद ट्रेडर्सच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मागील काही महिन्यांपासून जळगावात मोठ्या प्रमाणात बनावट विदेशी सिगारेट विकल्या जात असल्याच्या तक्रारी देखील होत आहेत.

Exit mobile version