Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आतापर्यंत गुलाब पाहिले, यापुणे काटे पहा ! : उध्दव ठाकरेंचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. यापुढे काटे पहा..असा इशारा गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. ते शिवसैनिकांशी संवाद साधतांना बोलत होते.

उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी शिवसैनिकांशी संवाद साधला. यात त्यांनी विरोधकांसह बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं कि शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही की, अशी आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. ती आता होतेय, असे ठाकरे म्हणाले.

दरम्यान, ते पुढे म्हणाले की, सध्या ज्यांना मी मोठं केलं, ते आपल्या सोबत नाहीयेत. पण त्यांना मोठे करणारे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. तुमच्याच ताकदीवर आपण त्यांना धडा शिकवू. पण आज नि:क्षून सांगतो, आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचं झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नविन गुलाब फुलविन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Exit mobile version