संस्कृती फाउंडेशन मार्फत सीड बॉल कार्यशाळेचे आयोजन

seed ball

भुसावळ प्रतिनिधी । येथील संस्कृती फाऊंडेशनतर्फे ८ जून रोजी सीड बॉल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरण दिन सप्ताह साजरा करण्यासाठी तसेच पर्यावरणाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे ह्यासाठी संस्कृती फाउंडेशन मार्फत उन्हाळ्याची सुट्टी सत्कर्मी लागण्यासाठी लहान मुलांसाठी तसेच पर्यावरण प्रेमींसाठी सीड बॉल बनविण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ह्या कार्यशाळेत सुमारे पाच हजार वृक्षांच्या बियांपासून सीड बॉल बनवून पावसाळ्यात त्याना ठीक ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. मातीवर सेंद्रीय पद्धतीने प्रक्रिया करून त्यांचे गोळे बनवून त्यात वेगवेगळ्या बिया लावून त्यांना सीड बॉल मध्ये रूपांतर केले जाते. पावसाळ्यात मोकळ्या मैदानावर तसेच माती असलेल्या ठिकाणी हे बॉल टाकल्यास काही दिवसांतच बियांना अंकुर फुटून त्यांचे रोपट्यात रूपांतर होते. यामुळे प्रयोगापासून व्यापक वृक्षारोपण केले जाऊ शकते.

या अनुषंगाने शनिवार ८ जून रोजी ठिक सकाळी ८ वाजेपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात ही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. पर्यावरण प्रेमी युवक व विद्यार्थ्यांनी ह्या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्कृती फाउंडेशन मार्फत करण्यात येत आहे सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला ई-सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे.

संस्कृती फाउंडेशन मार्फत पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या चार वर्षांपासून शहरात सातत्याने उपक्रम राबविले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून सिड बॉल म्हणजेच बीज गोळ्यांची कार्यशाळा शहरात घेण्यात येत आहे ह्यातुन तयार झालेल्या सीड बॉल चे पावसाळ्यात ठीक ठिकाणी वृक्षारोपनांसाठी उपयोग केला जाणार असून ह्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करावा असे आवाहन संस्कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content