Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कर्तव्यावर मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षा रक्षकांचे कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत

अमळनेर (प्रतिनिधी) कर्तव्यावर असतांना वाडी-शेवाळे धरण व सुलवाडे धरण येथील दोघा सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत केली नसून त्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर द्यावी अशी मागणी सोमा कढरे यांनी केली आहे.

 

जळगाव येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव महाधीक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, वाघूर धरण उपविभाग क्र ३ व ४ नसिराबाद कार्यालयाचे व निवास्थान परिसर व सांस्कृतिक हॉल, जळगाव परिसर तसेच वाघुर धरण उपविभाग क्र.१ वराडसीम अंतर्गत वाघूर धरण क्षेत्र परिसरातील सरंक्षणासाठी ३ पाळीत एकूण ३३ साधे दंडुकेधारी सुरक्षा रक्षक व ३ हत्यारी बंदूकधारी असे एकूण ३६ सुरक्षा रक्षकांचा नियुक्ती करार करण्यात आला होता. सुरक्षा रक्षकांचा कामाचे नियुक्तीचे ठिकाण किंवा परिसरात काही दुखापत झाल्यास त्यांच्या वैद्यकीय उपचाराची किंवा इतर शुल्काची जबाबदारी संबंधीत एजन्सीची असते. मात्र वाडी-शेवाळे धरण व सुलवाडे धरण येथील २ सुरक्षा रक्षक कामावर असतांना मयत झाले. मात्र एजन्सीने कुठलीही भरपाई अथवा विमा अगर इतर अर्थ साह्य त्यांच्या कुटुंबियांना अद्यापही दिलेले नाही. किमान वेतनदारापेक्षा कमी दाराचे टेंडर काढून आस्थापना व मक्तेदार यांनी सुरक्षा रक्षकांची फसवणूक केली असल्याचे दिसून येत आहे. तसेच महिन्याचे ३० दिवस राबवून एकही साप्ताहिक सुटी न देता रु ४५००/- ते ५०००/- सुरक्षा रक्षकांची बोळवण केलेली आहे. सदर मक्तेदाराकडे सरक्षा रक्षक अभिकरणाचा पसारा कायद्यानुसार कोणतेही दस्तावेज नसतांना बेकायदेशीर सुरक्षा रक्षक पुरवठा करण्याकामी सदर अस्थापनाने कमी दराचे मक्ता देऊन एक प्रकारे शासनाच्या किमान वेतन कायद्याची पायमल्ली केलेली आहे अशी माहिती माहिती अधिकारात उपलब्ध झालेली असून संबंधित अस्थापन व मक्तेदार यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सोमा कढरे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version