Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्लीत कलम १४४ लागू ; तर काही ठिकाणी इंटरनेट बंद

दिल्ली वृत्तसंस्था । नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या विधेयकाला विरोध करण्यात आज संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस आणि इतर भाजपविरोधी पक्षांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे देशभरात उद्रेकाचे वातावरण निर्माण झाले असून राजधानी दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी मोबाइल इंटरनेट, एसएमएस आणि व्हॉइस कॉल सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

भारती एअरटेल कंपनीची मोबाइल नेटवर्क सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती एअरटेल कंपनीकडून देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्राकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण, केंद्राने अशापद्धतीचे आदेश दिलेले असल्यास संपूर्ण दिल्लीत काही वेळात इतर मोबाइल नेटवर्क कंपन्यांचीही सेवा बंद होण्याची शक्यता आहे. देशातून या आंदोलनाला तरुणाईचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राजधानीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Exit mobile version