Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्नीवर गोळ्या झाडून सहसचिवाची आत्महत्या

पंढरपूर (वृत्तसंस्था) आपल्या पत्नीवर गोळीबार करुन मंत्रालयीन सचिवाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून काल रात्री आपल्या पत्नीवर 2 गोळ्या झाडल्या. यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे रहिवासी असलेले विजय पवार हे तालुक्यातील पहिले जिल्हाधिकारी बनले होते. नुकतीच त्यांची पोस्टींग मंत्रालयात कौशल्य विकास विभागात झाली होती. पवार यांच्या पत्नीला उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. विजयकुमार भागवत पवार मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असून सध्या ते मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते.

Exit mobile version