Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लवकरच होणार दुसर्‍या टप्प्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मोठी उत्सुकता लागून असलेला मंत्रीमंडळातील दुसर्‍या टप्प्याचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कार्यभार सांभाळल्यानंतर पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारालाच मोठा कालावधी लागल्याने टीका करण्यात आली होती. कसा तरी मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर मंत्र्यांनी कार्यभारच स्वीकारलेला नाही. पाच मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारला असून उर्वरित पितृपक्षानंतर प्रत्यक्ष कामास प्रारंभ करणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. यातच, आता सर्वांना दुसर्‍या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचे वेध लागलेले आहेत.

भाजप आणि शिंदे गट तसेच अपक्षांमधील काही आमदारांना दुसर्‍या मंत्रीमंडळात स्थान मिळणार असल्याची शक्यता आहे. यामुळे हा विस्तार नेमका केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात, नवरात्रोत्सवात आणि दसर्‍यापूर्वी मंत्रीमंडळातील दुसर्‍या टप्प्याचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याबाबत टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे.

Exit mobile version