Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्य बुध्दीबळ संघटनेच्या दुसऱ्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य बुध्दीबळ संघटना आयोजित महाराष्ट्र राज्यातील आर्बिटरच्या दुसऱ्या प्रशिक्षण शिबीराचे आज रविवारी सकाळी ९ वाजता ऑनलाईन उद्घाटन अखिल भारतीय बुध्दीबळ संघटनेचे उपाध्यक्ष वीपनेश भारद्वाज व खाजिनदार फारूख शेख यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रंसगी खजिनदार नरेश शर्मा, मुंबईचे राहुल शाह, महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे, ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी फारुक शेख यांनी महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर संपूर्ण भारतातील आर्बिटर यांना आपले करियर बुध्दीबळात करावयाचे असल्याने त्यांना जॉब सेक्युरिटी म्हणून अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने मासिक स्वरूपात पेन्शनची योजना आखावी व त्यांना पेन्शन देण्यात यावी अशी मागणी केली. शेख यांच्या मागणी बाबत महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर व भारतीय महासंघाचे उपाध्यक्ष वीपनेश भारद्वाज, खजिनदार नरेश शर्मा यांनी  चांगले सजेशन असल्याने ते विचारात घ्यावे लागेल असे मत व्यक्त केले.

ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटनाचे सुत्रसंचलन महाराष्ट्राचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर यांनी केले तर आभार सचिव निरंजन गोडबोले यांनी मानले. या शिबिरात मंगेश गंभीरे, स्वप्निल बनसोडे, भरत चौगुले, विलास म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात एकूण 25 आर्बिटरचा समावेश आहे.  जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेऊन प्रमाणपत्र व मानांकन देण्यात येणार असल्याचे फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Exit mobile version