राज्यसभेच्या बदल्यात विधानपरिषदेत जागा : मविआचा प्रस्ताव भाजपला अमान्य

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या सहा जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. तर राज्यसभेची जागा मविआ विशेषतः शिवसेनेने महत्वाची केली असून राज्यसभेच्या बदल्यात विधानपरिषदेत जागा देऊ, असा प्रस्ताव महाविकास आघाडीने भाजपला दिला. याला भाजपने नकार दिला आहे.

गेल्या २० वर्षापासून राज्यसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका बिनविरोध घेण्याची परंपरा आहे. पण निवडणूक तथ्यांच्या आधारे बिनविरोध होते.    त्यामुळे आमचा आग्रह आहे की भाजपाला राज्यसभेच्या तिन्ही जागा मिळाव्यात आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत काही विचार करता येईल. आमचा उमेदवार माघार घेणार नाही. आज ३ वाजेपर्यंत माघार घेण्याचा वेळ असून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यानंतर तोच प्रस्ताव वारंवार मांडला असल्याचेही भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

इडीने बारकाईने लक्ष देण्याची गरज-खा. संजय राऊत 

तर दुसरीकडे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविआचे शिष्टमंडळ विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करीत फडणवीस परिपक्व नेते असून हे एक अत्यंत चांगलं पाऊल आहे. राज्यातील राजकीय वातावरण प्रदूषित, गढूळ असताना राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अजून बिघडत असून त्यासाठी घोडेबाजार अत्यंत वाईट पद्धतीने सुरु आहे. याकडे इडीने बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना खा. राऊत यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content