Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एसडीआरएफ बोट दुर्घटना : पांढरदच्या जवानाला वीरमरण

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणात बुडालेल्यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट पाण्यात बुडून तीन जवांनाचा मृत्यू झाला असून यात पांढरद येथील जवान वैभव वाघ यांचा देखील समावेश असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबतची माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदीत एसडीआरएफची बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे. यातील दोन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल अर्थात एसडीआरएफचे पथक एका बोटीतून नदीपात्रात शोध घेत होते. शोध सुरू असतांनाच जवानांची बोट उलटली. यात तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता झाले आहेत. यात वैभव वाघ यांना वीरमरण प्राप्त झाले आहे.

आज कर्तव्यावर असतांना हुतात्मा झालेले जवान वैभव वाघ हे धुळे पोलिस दलातील म्हणून कार्यरत होते. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे बोट दुर्घटनेत तीन जवानाचे दु:ख निधन झाले, त्यात वैभव वाघ यांचेही निधन झाले. वैभव वाघ यांचे बालपण हे पिचर्डे गावी आजोबा यांच्या कडे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत, अतिशय हुशार अभ्यासु होते घरची परिस्थिती गरिबीची होती त्यातून यश मिळवत पुढे त्यांनी पुढील शिक्षण हे भडगाव येथे घेतले. अवघ्या बारा दिवसांचा असतांनाच वडीलाचे छत्र हरपले त्यांनतर पुढील शिक्षण हे भडगाव येथे झाले डी.एड सोबत बी्यचे शिक्षण घेतले त्यांनतर २०१४ मध्ये ते गोरेगाव मुंबई येथील भरती झाले त्यानंतर ते धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलात रुजु झाले होते.

दरम्यान, आठ वर्षा पुर्वी लग्न झाले होते भडगाव तालुक्यातील मोठा मित्र परिवार वैभव यांचा होता. आज त्यांच्या वीर मरणाची बातमी येताच परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा असा परिवार आहे.

Exit mobile version