Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सरदार पटेल इंग्लिश स्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शन

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे संचलित सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये विज्ञान दिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यानी विज्ञान विषयावर केलेल्या कला अविष्काराचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले. या विज्ञान दिन निमित्ताने स्कुलच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील शाहरुख खान (उपशिक्षक हाजी अजीज पहेलवान उर्दू गर्ल हायस्कुल भुसावळ) यांना आमंत्रित करण्यात आले.

कार्यक्रमात सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते शाहरुख खान यांचा सत्कार करण्यात आला व ईतर शिक्षकांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शाहरुख खान यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी अत्यंत कुशलतेने विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले विद्यार्थी प्रात्यक्षिक करताना अत्यंत उत्साहीत दिसुन येत होते. तसेच त्यांनी प्रत्येक प्रयोगासाठी अत्यंत परिश्रम घेतलेले दिसून आले .त्यांची कार्य कुशलता खरोखरच स्तुतिप्रिय होती.

या विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात विशेष भर पडली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फर्जेद खान सर यांनी केले. अशा प्रकारे विज्ञान दिन विद्यार्थ्यांच्या मोठया उपास्थित अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला. याप्रसंगी संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था संचालक प्रशांत फेगडे व स्कुलच्या मुख्यध्यापिका शिला तायडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले .

Exit mobile version