Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शालेय जळगाव म.न.पा. योगासन स्पर्धा उत्सहात

WhatsApp Image 2019 09 17 at 3.53.04 PM

जळगाव, प्रतिनिधी | येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा हौशी योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जळगाव म.न.पा. योगासन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेचे उद्घाटन बाल विश्व इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संचालिका भारती चौधरी, म.न.पा. क्रीडा समन्वयक उमाकांत भारुडे, आंतरराष्ट्रीय पंच व सचिव डॉ. अनिता पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. डिगंबर महाजन , नरेंद्र भोई ,राष्ट्रीय पंच रुद्राणी देवरे, प्रतिभा सपकाळे, चेतन वाघ- मालेगाव, स्वप्निल चौधरी, वालझडे मॅडम नासिक आदी उपस्थित होते. उमाकांत भारुडे व भारती चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवुन दिले व शुभेच्छा दिल्या. यशस्वी खेळाडूंचे जिल्हा क्रिडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी अभिनंदन करून पुढील योगस्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याश्वितेसाठी वर्षा शर्मा, सुशिल तळवेलकर आदींनी सहकार्य केले.

स्पर्धेचा निकाल :- १४ वर्षाखालील मुले- आदित्य सपकाळे-रोझलँड इंलिश मिडीयम हायस्कूल , हिमांशू सोनवणे- आर. आर. विद्यालय , आर्य महेश पवार-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल, नैतिक पाटील-ओरीयन इंलिश मिडीयम स्कूल , धीरज राजपूत-सेंट लॉरेन्स स्कूल , उज्वल जुमानी -रिदमिक-ओरीयन सी. बी.एस.सी.स्कूल , सागर वरपे-आर्टिस्टीक-महाराणा प्रताप स्कूल १४ वर्षाखालील मुली :- सृष्टी वाणी-प.न.लुंकड विद्यालय , रुद्राक्षी भावे-ओरीयन सी. बी.एस.सी.स्कूल , गौरी महाजन-प.न. लुंकड , जनव्ही सोमाणी-सेंट टेरेसा स्कूल , यशश्री सपकाळे-रोझ लँड इंलिश मिडीयम हायस्कूल १७ वर्षाखालील मुले :-
वेद चौधरी-सेंट टेरेस स्कूल , मनिष चावरे-भगीरथ इंग्लिश स्कूल , चिन्मय देशमुख-ला.ना.सार्वजनिक , आशिष महाजन-सेंट टेरेस स्कूल , ओंम गुरव-झेड. पी.विद्यानिकेतन , वेद चौधरी-रिदमिक-सेंट लॉरेन्स स्कूल , गुंजन भंगाळे-आर्टिस्टीक-सेंट लॉरेन्स स्कूल १७ वर्षाखालील मुली :- समृद्धी सपकाळे-रोझलँड इंलिश मिडीयम हायस्कूल , निधी जोशी-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल , सोनाली पाटील-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल  स्कुल, प्रिया मोटवानी-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल , शिवानी मुथा-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल , समृद्धी सपकाळे-रिदमिक-उज्वल स्प्राऊटर इंटरनँशनल स्कुल , मोहिनी धीवर-आर्टिस्टीक-झेड. पी.विद्यानिकेतन १९ वर्षाखालील मुले :-ईश्वर शिरोले , धीरज पाटील , ईश्वर शिरोले-रिदमिक ( तिघे एम. जे. कॉलेज) . १९ वर्षाखालील मुली:– चेतना देवरे-ओरियन इंलिश मिडीयम स्कुल, चेतना देवरे-रिदमिक- ओरियन इंलिश मिडीयम स्कुल.

Exit mobile version