Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे किल्ले सज्जनगडावर सागवानी दरवाजाचे लोकार्पण (व्हिडीओ)

udayan bhosale news

चाळीसगाव प्रतिनिधी । सह्याद्री प्रतिष्ठान संकल्पनेतून किल्ले सज्जनगडावर बसवला सागवानी दरवाजाचे श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याहस्ते १५ सप्टेंबर २०१९ रोजी लोकार्पण करण्यात आले. या प्रवेशद्वाराचे पूर्वीचे एकेरी वाक्यप्रयोग असलेले नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ठेवण्यात आले. या सोहळ्यास अनेक मान्यवर तसेच छत्रपती संभाजी महाराज मालिके मधील कलाकार महेश कोकाटे (अनाजी पंत), रमेश रोकडे (हिरोजी काका), ओम चंदणे (बाळ राजे), गणेश लोणारे (जोत्याजी) यांच्या उपस्थितीत शाहिरांच्या पोवाड्याने तर इतिहास वाख्याते रविंद्र यादव सरांच्या वाख्यानाने त्यात आणखीनच स्फूर्ती मिळाली.

या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी साताराच नव्हे तर पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पेण, नगर, चाळीसगाव, अकोले, नाशिक, मुरबाड, अलिबाग व कोकणातून सह्याद्री दुर्गसेवक तसेच दुर्गप्रेमींच्या प्रचंड उपस्थिथित मोठ्या जल्लोषात हा सोहळा संपन्न झाला. सह्याद्रीच्या दुर्गसेवकांच्या कर्तव्यदक्ष कृतीस मान्यवरांच्या स्थुतीतून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच शिवकार्याची निःस्वार्थ सेवा हरिश्चंद्र बागडे सर व संपूर्ण सह्याद्री प्रतिष्ठान सातारा टीमच्या नियोजनबद्ध कार्यास संस्थेचे संस्थापक श्रमिक सरांकडून कौतुकाची थाप पडली.

Exit mobile version