Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावखेडासिम प्रा. आ. केंद्रामार्फत कोविडबाबत जनजागृती

यावल प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्यातील सावखेडा सिम येथील प्राथमिक केंद्राच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्‍हाटे, डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील उपकेंद्र दहिगाव, मोहराळा, सातोद, व कोळवद येथे कोविड-१९ विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत ग्रामपंचायतला सभा घेण्यात येऊन जनजागृतीसह स्वॅब तपासणी करण्यात आली. 

तसेच संशयित रुग्णांचे आर टीपीसी आर स्वॅब (टेस्ट) घेण्यात आले. प्रा. आ. केंद्र साखळी येथे डॉ. हेमंत ब-हाटे यांनी खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची सभा घेऊन मार्गदर्शन केले. दहिगाव येथे डॉ. खालिद शेख राजेंद्र बारी, यांनी ग्रा.पं. येथे सभा घेऊन जनजागृती केली. तसेच संशयित रुग्णांचे स्वॅब घेतले. यावेळी सरपंच श्री अजय अडकमोल ,सत्तार तडवी , ग्रामसेवक व्ही. एल. पाटील ,ग्रा.पं. चे पदाधिकारी , कर्मचारी व आशा सेविका उपस्थित होत्या. उपकेंद्र दहिगाव, मोहराळा , सातोद , व कोळवद येथे ही ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात येऊन 40 संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्यात येऊन जळगाव येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. जनजागृती व शिबीर यशस्वीतेसाठी डॉ. साजिद तडवी, डॉ. रोशन आरा, डॉ. राहुल गजरे ,राजेंद्र बारी, बालाजी कोरडे, भुषण पाटील, अनिता नेहते ,महेमुद तडवी, प्रतिभा चौधरी व आशा सेविका यांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version