Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा येथील जी.एस. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने बुधवारी १३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्ष लागवडीचा संकल्प करूया, वृक्षाचं संवर्धन करूया अशी शपथ घेत गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वनस्पतीचे वृक्षारोपण केले. या कार्यक्रमात जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या विध्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुपौर्णिमा दिनानिमित्त गुरू-शिष्यांच्या जोड्यांचा कथाकथनाचा कार्यक्रम यावेळी पार पडला. तसेच पर्यावरण, निसर्ग, पशू-पक्षी, पुस्तके, इंटरनेट, संगणक, शाळा, शिक्षक अशा सर्व सजीव, निर्जीव गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करू, अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी यावेळी दिली. यानंतर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची शपथ विध्यार्थांकडून घेण्यात आली.

यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी मनोगत व्यक्त करत, जीवनातील गुरुचे महत्व अधोरेखित करत, गुरु-शिष्याची चालत आलेली परंपरा यावर विचार मांडले, तसेच वृक्षसंवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे सांगत विध्यार्थ्यांना वृक्षरोपणाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी आरती पाटील, अल्फिया लहरी, प्राजक्ता पाटील विजया लोंढे, ममता शरण, अश्विनी घोगले, निधी खडके, मीना पाटील, संजय चव्हाण,सोनिया शर्मा, अमन पांडे, शुभांगी बडगुजर, तुषार कुमावत यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.

या कार्यक्रमासाठी आरती पाटील, अल्फिया लहरी, प्रजक्ता पाटीला लोंढे, ममता शरण, अश्विनी घोगले, विजय खडके, मीना पाटील, संजय शर्मा, सोनिया शर्मा, अमन पांडे, शुभांगी बडगुजर, तुषार कुमावत यांनी जन्म दिला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीरीत्या जाहीर केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका राजुल रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version