Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावित्रीबाई महिला मंडळाच्या भगिनींचा ‘वसंत पंचमी’ला वृक्षपूजन व संवर्धनाचा संकल्प

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘वसंत पंचमी’ निमित्त ‘सावित्रीबाई महिला मंडळ शिवकॉलनी, आशाबाबा परिसर शाखे’च्या वतीने ‘उदय कॉलनी’मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला मंडळातर्फे वृक्षपूजन व संवर्धनाचा केला संकल्प करण्यात आला.

‘वसंत पंचमी’ निमित्त शिंपी समाज भक्ती महिला मंडळ संचलीत सावित्रीबाई महिला मंडळ शिवकॉलनी, आशाबाबा परिसर शाखेच्या वतीने ५ रोजी दुपारी ४ वाजता उदय कॉलनी मध्ये हळदी कुंकवाचा कार्याक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला शहराध्यक्षा रेखा निकुंभ हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका दिपमाला काळे,भा ज पा महिला जिल्हाध्यक्षा दिप्ती चिरमाडे, डॉ सविता तलहार, आशा जगताप हे होते. कार्यक्रमाला माजी महापौर सीमा भोळे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमांच्या सुरवातीला दीपप्रज्वलन व प्रतीमा पुजन मान्यवरांच्या व मंडळाच्या अध्यक्षा वैशाली भांडारकर, भाग्यश्री जगताप, रंजना साळवे, रूपाली निकुंभ, नयना जगताप, सारिका शिंपी, भारती निकुंभ यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमात नगरसेविका दिपमाला काळे, दिप्ती चिरमाडे यांच्या हस्ते वृक्षपुजन करून संवर्धनाचा संकल्प करत, महिला मंडळातर्फे हळदी, कुंकू व वाण देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षीका खैरनार यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळच्या उपाध्यक्षा मीना कापुरे, रूपाली निकुंभ, सुनिता भांडारकर, वर्षा शिंपी, संगीता कापुरे, सुरेखा सनांसे,स्वाती सोनवणे, वैशाली शिंपी, सोनाली बाविस्कर, अर्चना पवार, मनिषा कापुरे, वंदना जगताप, वैशाली जगताप,नीलम शिंपी, स्नेहा सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version