Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूरच्या सावित्रीबाई फुले विदयालयाचा दहावीचा ६३ .२६ टक्के निकाल !

pahur students

पहूर, ता . जामनेर प्रतिनिधी । शालांत परीक्षेत पहूर -कसबे येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयाचा निकाल ६३.२६ टक्के लागला.

शाळेच्या ९८विदयार्थ्यांपैकी ६२ विदयार्थी उत्तीर्ण झाले. यात नवल शंकर कोंडे याने ८७ .२० % गुणांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. नयना शांताराम घोंगडे हिने द्वितीय क्रमांक तर ईश्‍वर रामलाल चौधरी याने तृतीय क्रमांक पटकविला. तसेच शाईना मुक्तार पठाण या विदयार्थीनीने सामाजीकशास्त्र विषयांत १०० पैकी ९८ गुण मिळवून चौथा क्रमांक प्राप्त केला. हिवरखेडे येथील किरण प्रवीण पाटील हिने ७४.८ % गुण मिळवून शाळेतून पाचवा क्रमांक प्राप्त केला. संस्थेच्या वतीने सर्व गुणवंत विदयार्थ्यांच्या घरी जावून त्यांचा व पालकांचा गुलाबपुष्प देवून व पेढा भरवून सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक ज्ञानेश्‍वर लहासे, मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख, कल्पना बनकर, माधूरी बारी, शंकर भामेरे, भगवान जाधव , हरिभाऊ राऊत, आश्‍विनी पाटील, युनूस तडवी, प्रकाश जोशी, सुनिल पवार, संजय बनसोडे यांच्यासह पालक उपस्थित होते.

उत्तीर्ण विदयार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बाबुराव घोंगडे, उपाध्यक्ष शांताराम पाटील, सचिव भगवान घोंगडे, कोषाध्यक्ष शंकर घोंगडे, संचालक वंदना वानखेडे , लक्ष्मण गोरे, अशोक बनकर, युसूफ बाबा , समाधान पाटील, विनोद थोरात यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version