Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावद्यात ‘आनंदाचा शिधा’ किटचे वाटप

सावदा,ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे राज्य शासनाने जाहीर केलेल्या आनंदाचा शिधा किटचे आज वाटप करण्यात आले.

शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळी सणानिमित्त अन्नधान्याव्यतीरीक्त प्रती शिधापत्रिका १ किलो रवा,१ किलो चना डाळ,१ किलो साखर १लिटर तेल या चार शिधाजिन्नसांचा संच १०० रूपये या दराने वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या अंतर्गत सावदा येथे भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून भुषण सुरवाडकर यांच्या रेशनिंग दुकानात आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,बेटी बचाओ बेटी पढाओ च्या जळगाव जिल्हा संयोजक सारीका चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष जे. के. भारंबे, सरचिटणीस संतोष परदेशी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सागर चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सर्वेश लोमटे , नितीन वाणी, सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान क्र १२ चे संचालक भुषण सुरवाडकर व भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी उपस्थित होते.

Exit mobile version