सावदा नगरपालिकेसाठी असे असेल आरक्षण : जाणून घ्या अचूक माहिती

सावदा, ता. रावेर, जितेंद्र कुलकर्णी | आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी येथील १० प्रभागांमधील २० जागांसाठीचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले असून यामुळे नगरपालिका निवडणुकीची नांदी झडली आहे.

आगामी नगरपालिका निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहेत. या अनुषंगाने आज सोमवार दिनांक १३ जून रोजी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. यंदाच्या निवडणुकीत ( सध्या तरी ! ) ओबीसी आरक्षण नसल्यामुळे आजच्या आरक्षण सोडतीत सर्वसाधारण खुला, महिला राखीव, अनुसूचीत जाती ( एस.सी.) आणि अनुसूचित जमाती ( एस. टी. ) अशा चार प्रवर्गांसाठी जागांची सोडत काढण्यात आली.

सावदा नगरपालिकेत वाढीव लोकसंख्येनुसार आता १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडून जाणार आहेत. यातील १ ते १० प्रभागांचे आरक्षण हे खालीलप्रमाणे असणार आहे.

प्रभाग क्रमांक १ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक २ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ३ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ४ : अ – अनुसूचीत जाती
ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ५ : अ – अनुसूचीत जाती महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ६ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ७ : अ – अनुसूचीत जमाती
ब – सर्वसाधारण महिला

प्रभाग क्रमांक ८ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक ९ : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक १० : अ – सर्वसाधारण महिला
ब – सर्वसाधारण

दरम्यान, सोडत काढतांना प्रांताधिकारी कैलास कडलग, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content