Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण ; भाजपतर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप

सावदा, प्रतिनिधी । नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात केंद्रात सरकार  स्थापन होवून आज ७  वर्ष पुर्ण  झाल्याबद्दल येथे भाजपतर्फे उतारकरू नागरिक व अपंग बांधवांना मास्क व  सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सात वर्षाच्या कालावधीत गरीब जनतेला मोफत धान्य, शेतकरी बांधवांना आर्थिक सहकार्य, कोरोना काळात अनाथ मुलांना शिक्षण मोफत व आर्थिक मदत ,राम मंदिराचा निर्माण करण्याचा निर्णय, ३७० कलम रद्द, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.  सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात जनतेने नियम पाळावे म्हणून सावदा शहरामध्ये मोदी सरकारची सात वर्ष पुर्ण झाले बद्दल गरीब उतारकरू नागरीकांना, तसेच अपंग बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी मा.नगराध्यक्ष व नगरसेवक राजेंद्र चौधरी,विनोद नेमाडे, भरत भंगाळे, लतेष चौधरी, गजानन ठोसरे, सागर चौधरी, अक्षय सरोदे, सर्वेश लोमटे, अजय कासार, संतोष परदेशी, गजानन भार्गव, महेश अकोले, विजय पाटील, तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version