Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतात चोरी करणार्‍यांची शिरजोरी : शेतकर्‍यांवर खुरपीने हल्ला

सावदा, ता. रावेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिनावल शिवारातून केळीचे घड आणि हरभरा चोरून नेणार्‍यांना शेतकर्‍यांनी हटकले असतांना त्यांनी शेतकर्‍यांवरच खुरपीने हल्ला करण्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सावदा ता रावेर चिनावल येथे आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दु २ वाजेच्या सुमारास सावखेडा रोड वरील डोंगर रस्त्यावर अशोक नामदेव महाजन यांचे गावालगत च्या केळी च्या शेतात याच शेता लगत राहत असलेल्या घरांमधील महिला या केळी बागातीत केळी घड तर काही महिला बाजूच्या शेतातील हरबरा चोरून कापून नेत असताना याच केळी बागात केळी घड झाकत असलेल्या तुषार अशोक महाजन यांच्या लक्षात हा प्रकार आला.

त्यानी ह्या महिलांना हटकून तुम्ही येथून निघून जाण्यासाठी सांगीतले मात्र ह्या महिलांनी त्याच्याशी हुज्जत घालून त्याला अक्षरक्ष: मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्या हातास चावा घेवून खुरपी ने हातावर वार केल.े या वेळी त्याने सोबत असलेल्या त्याचे चुलत भाऊ यांना मदती साठी हाक मारली तो पर्यंत ह्या महिलांनी त्याचे कुटुंबीय व शेजारी ईसमाना बोलवून तुषार व त्यांचे सोबत असलेले मंगेश विलास महाजन व निर्मल युवराज महाजन यांना टोकर , लाकडी दांडके , यांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केली.

यात निर्मल महाजन या युवकाच्या हाताला व नाकास जबर दुखापत झाली तर मंगेश महाजन याला सुद्दा जबर मारहाण केली या बाबत चे वृत्त चिनावल गावात समजताच शेतकर्‍यांना नी नेहमीच आम्हाला या लोकांचा त्रास होतो म्हणून सावदा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली व या चोरट्यां वर कठोर कारवाई साठी या वेळी ठिय्या मांडला.

शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होते ,आज जिवे मारण्याचा प्रयत्न केला यात तरुण शेतकर्‍यांना मारहाण केल्याने चिनावल ,रोझोदा ,कुभारखेड परिसरात खळबळ माजली याबाबत तुषार अशोक महाजन यांनी सावदा पोलीस स्टेशनला येवून सदर प्रकार सावदा पो.स्टे.चे स.पो .नी देविदास इंगोले पो.उप.निरिक्षक राजेंद्र पवार यांना सांगून मारहाण झाल्याचे दिसून आल्याने तुषार , मंगेश व निर्मल महाजन यांची सावदा रग्णालयात वैद्यकीय तपासणी साठी पाठवले.

यात निर्मल महाजन यांच्या हातास मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने त्याना फैजपूर येथील डॉ शैलेश खाचणे यांच्या कडे दाखल करण्यात आले आहे. या बाबत सावदा पो .स्टे.ला तुषार महाजन यांनी फिर्याद दिल्यावरुन अनिता रामा सपकाळे ,रामा शामा सपकाळे व अन्य २ जणांविरोधात गुन्हा रजि नंबर १९ /२२ भा.द.वि.कलम ३७९ ,३२३, ५०४,५०६ ,३२४ ,५११,३४ अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वेळी ग्रामपंचायत सदस्य सागर भारंबे यांना ही धक्का बुक्की करणात आली.

या प्रकरणी स पो नि इंगोले ,पो.उप.नि.पवार , गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे का विनोद पाटील व सहकारी तपास करीत आहे या वेळी उपस्थित शेतकर्‍यांनी आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version