Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : सावकारांवर छापेसत्र; सहकार खात्याच्या कारवाईने खळबळ

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने सावद्यासह अन्य ठिकाणी आज सकाळपासून छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. अवैध सावकारी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सावद्यासह परिसरात खासगी सावकारी हा खूप मोठा विषय आहे. आदी अनेकदा याबाबत आरोप करण्यात आले असूनही आजवर ठोस कारवाई झालेली नव्हती. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळपासून सावदा येथील एका मोठ्या सावकारावर सहकार खात्याच्या पथकाने छापे टाकले. या कारवाईबाबत अद्यापही काहीच माहिती देण्यात आली नसली तरी त्या सावकाराच्या तिन्ही घरांच्या बाहेर सहकार खात्याच्या चारचाकी गाड्या उभ्या असल्याचे आढळून आले आहे.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने संबंधीत छाप्यातील अधिकार्‍यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, कारवाई पूर्ण झाल्यानंतरच याची माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर याच प्रमाणे रावेर, वरणगाव आदी ठिकाणी देखील सहकार खात्यातर्फे छापेसत्र टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version