Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जीर्ण विद्युत तारा बदलून द्या : राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची मागणी

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | शहरातील ख्वाजानगरसह परिसरातील जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलून मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते फिरोजखान पठाण यांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

खिरोदा नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण यांनी आज वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, ख्वाजानगरसह परिसरात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असतो. या भागातील विजेच्या तारा या जुनाट व जीर्ण झालेल्या आहेत. बर्‍याच ठिकाणी या तारा तुटून पडल्या आहेत. यामुळे या तारा बदलून मिळाव्यात अशी परिसरातील नागरिकांनी अनेकदा मागणी केली आहे. मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा याबाबत शिफारस केली आहे.

या बाबींची दखल घेत वीज वितरण कंपनीने या भागातील जीर्ण झालेल्या तारा बदलून द्याव्यात. जेणेकरून परिसरात सुरळीत वीज पुरवठा करण्यात येईल अशी मागणी या निवेदना करण्यात आली आहे फिरोजखान पठाण यांनी या मागणीचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या उपअभियंत्यांना दिले असून यावर कार्यवाहीची मागणी केली आहे.

Exit mobile version