Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची बादली

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरव जोशी यांची औरंगाबाद महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली असून त्यांच्याजागी फैजपूरचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. 

सविस्तर माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या बदलीचे संकेत मिळाले होते. आज अखेर अवर सचिवांच्या आदेशान्वये बदल्यांचे आदेश प्राप्त झाले आहे. यात सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांची बदली औरंगाबाद महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. फैजपूरचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची सावदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. असे आदेश आज बुधवार ११ ऑगस्ट रोजी संबंधित नगरपरिषदेला प्राप्त झाले आहे. आदेश काढल्यानंतर सध्याचे पदावरून कार्यमुक्त होवून नियुक्त केलेल्या पदावर नियुक्त होवून अनुपालनाचा अहवाल तात्काळ सादर करावा असे निर्देश अवर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी दिले आहे. 

 

Exit mobile version