Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

साश्रु नायनांनी शहीद दत्तात्रय पाटील यांना दिला अखेरचा निरोप

भडगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील भातखंडे येथील रहिवासी सैन्य दलातील शहीद जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील यांना साश्रु नयनानी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी शहीद जवान आमर रहे यांसह विविध घोषणा देण्यात आल्या.

जवान दत्तात्रय पाटील यांना मंगळवारी दि ४ रोजी वीरगती प्राप्त झाली. विर जवान दत्तात्रय पाटील अमर रहे,,,च्या जयघोषात ‘३०५ फिड रेजिमेंट जवान दत्तात्रय पाटील यांच्या पार्थीववार शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.

गावात शोकाकुल वातावरणात

संपूर्ण गावात रांगोळी काढून त्या नंतर फुलांनी सजविलेल्या वाहनातून शोकाकुल वातावरणात शहिद अत्यंयात्रा काढण्यात आली. गावातील माध्यमिक शाळेच्या स्काॅऊट गाइड विद्यार्थी तसेच माध्यमिक विद्यालय भातखंडे शाळेच्या वतीने संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आला होता.

चिमुरड्यांनी दिली अखेरची सलीमी

शहिद जवान दत्तात्रय पाटील पोलीसांनी मानवंदना दिल्यानंतर सलामी देण्यात आली. मुलगा चिन्मय आणि विणू यां दोघ मुलींनी दिला अग्नीडाग दिला यावेळी आई प्रमीलाबाई, वडील विठ्ठल पाटील पत्नी ज्योतीबाई यांचा हुंकार ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

पत्नीच्या स्वाधीन केला तिरंगा

शहीद जवान दत्तात्रय पाटील यांच्या पत्नीकडे अधिकार्‍यांनी व जवान यांनी वर्दी व तिरंगा दिला या वेळी उपस्थीतांनी भारत माताकी जय, शहीद जवान अमर रहे च्या घोषणा देवून परिसर दणादूण सोडला होता. शहीद जवान हा अत्यंत शांत व संयमी सोज्वळ स्वभावाचा व मनमिळाऊ होता त्याच्या या स्वभावामुळे तो संपूर्ण गावाचा लाडका होता.

यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयातील वेल्फेअर अॉफीसर अनुरथ वाकडे, रतिलाल महाजन भीमराव पाटील, जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस हेड कॉटर पथक प्रमुख, पोलीस प्रशिक्षक विजय शिंदे, माजी सैनिक अध्यक्ष बाळू पाटील, पाचोरा माजी सैनिक अध्यक्ष दिपक पाटील व कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी पाचोरा प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल, भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, नायब तहसीलदार रमेश देवकर, गटविकास अधिकारी रमेश वाघ, पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर, राजकीय क्षेत्रातील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रताप पाटील, भातखंडे चे प्रथम नागरिक भागाबाई भिल, पारोळा मार्केट कमिटी चेअरमन अमोल चिमनराव पाटील, भडगाव माजी नगराध्यक्ष शामकांत पाटील, दिनकर पाटील, देविदास पाटील, माधवराव पाटील संजय पाटील, भातखंडे येथील विविध संस्था पदाधिकारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version