Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्वांगिण विकास हाच भाजपचा केंद्रबिंदु – नगराध्यक्षा साधना महाजन

sadhana mahaja

जामनेर (प्रतिनिधी)। प्रत्येकाला विकासाचा फायदा व्हावा यासाठी केंद्र शासनासह राज्यशासनाचा प्रयत्न आहे, कारण सर्वांचा सर्वांगीण विकास हाच भारतीय जनता पक्षाचा केंद्रबिंदु असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा साधना महाजन यांनी केले. तालुक्यातील देवळसगांव येथे भारतीय जनता युवा मोर्चा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

देवळसगाव येथे भाजयुमो शाखेचे उद्घाटन
शेतकऱ्यांसह सर्वांसाठी आणलेल्या अनेक लोकाभिमुख योजनांमुळे झपाट्याने विकास होत असल्याचे मतही यावेळी नगराध्यक्षा महाजन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी साधना महाजन यांच्याहस्ते भाजयुमो शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमामधे भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाला जिपच्या सभापती रजनी चव्हाण, पं.स.सभापती नीता पाटील, विलास पाटील, रमण चौधरी, शैलेश गिल, भागवत पाटील आदी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाखेची कार्यकारिणी घोषीत
भाजयुमो शाखेची कार्यकारीणी यावेळी घोषीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी उमेशसिंग ईंगळे तर उपाध्यक्षपदी शिवाजी दांडगे, चरणसिंग पाटील यांची निवड करण्यात आली. उर्वरित सदस्यपदी सुरेश भिल, मनोज कोळी, योगेश इंगळे, प्रविण पाटील, विनोद कोळी, गजानन भिल, विनोद नाईकनवरे, संतोष कांबळे, संदीप तायडे, कोमल देशमुख, प्रकाश राऊळ, सोपान कोळी, अमोल पाटील, गोपाळ जवानसिंग, प्रवीण तायडे, नितीन इंगळे, विशाल पाटील, अजय इंगळे, सुधाकर राऊळ, गणेश शिसोदे आदींचा समावेश आहे.

Exit mobile version