Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सर्पदंशाने तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील पेट भागात राहणारा २४ वर्षीय तरूणाचा संर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजू पंडीत पाटील (वय-२४) रा. भडगाव पेट, भडगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

राजू पाटील हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार १३ एप्रिल रोजी राजू पाटील हा वडजी शिवारातील त्यांच्या शेतात गेला होता. शेतातील बांधावर गवत कापत असतांना त्याच्या पायाला पायाला सापाने दंश केला. त्याला अत्यवस्थ वाटत असल्याने शेतातील काम करणाऱ्या नातेवाईकांनी खासगी वाहनाने भडगाव ग्रामीण रूग्णाालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार घेत असतांना दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास गिते करीत आहे.

Exit mobile version