Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरपावली जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांचे सरपंचानी केलं स्वागत

यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोरपावली येथील शाळा सुरु झाल्या. असून जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांना पुष्पगुच्छ व विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन सरपंच विलास अडकमोल यांनी स्वागत केले

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या प्राथमिक शाळा राज्य शासन व शिक्षण विभागाने सुरु केल्या आहे. यावल तालुक्यातील कोरपावली येथील १ ते ७ वी पर्यंतच्या शाळा झाल्या. जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक व विदयार्थी यांना पुष्पगुच्छ आणि देऊन चॉकलेट देऊन विध्यार्थ्यांचे स्वागत आणि शिक्षकांचे सरपंच विलास अडकमोल आणि सहकारी यांनी स्वागत केले.

यावेळी कोरपावली गावाचे सरपंच विलास अडकमोल, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष तथा कोरपावलीचे माजी सरपंच जलील सत्तार पटेल, मराठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी, उर्दू जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जावेद तडवी, ग्राम पंचायत सदस्य सिकंदर तडवी, ग्राम पंचायत आरिफ तडवी, निवृत्ती भिरुड,रमेश काळे, तालेब पटेल, नईम पटेल, रिजवान पटेल, तंजील पटेल, ग्राम पंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी यांच्यासह विद्यार्थी पालक व गावकरी मंडळी शाळेच्या आवारात उपस्थित होते. पहील्या दिवसी ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली .

Exit mobile version