Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनाजी नाना महाविद्यालयात सरदार पटेल व इंदिरा गांधी यांना आंदरांजली

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सरदार वल्लभ भाई पटेल जयंती व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिवसानिमित्त आदरांजली  वाहून अभिवादन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य ए. आय. भंगाळे, उपप्राचार्य डॉ.एस व्ही जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेची शपथ  रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवर व स्वयंसेवकांना दिली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. शेरसिंग पाडवी, लेफ्टनंट  डॉ.राजेंद्र राजपूत, कैलास चंदनशिव, रासेयो विद्यार्थिनी प्रतिनिधी रोहिणी माळी यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version