‘वनमहोत्सव’ कालावधीत वृक्षप्रेमींना सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध होणाऱ्या रोपवाटिकांची माहिती

जळगाव प्रतिनिधी । ‘वनमहोत्सव’ कालावधीत शासकीय व निमशसकीय यंत्रणा, नागरिक व वृक्षप्रेमी यांना वृक्ष लागवड करण्यासाठी लागणारी रोपे वन विभागामार्फत माफक दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. असे जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक डिगंबर पगार यांनी कळविले आहे.

वनविभागाकडे उपलब्ध असलेल्या रोपवाटीकांची माहिती
जळगाव वन विभाग, जळगाव
वनक्षेत्र-एरंडोल, रोपवाटीकेचे नाव- खडका, रोपे पुरवठा होणाऱ्या तालुक्याचे नांव-धरणगाव, एरंडोल,

वनक्षेत्र-वढोदा, रोपवाटीकेचे नाव-चारठाणा,  तालुक्याचे नांव- मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ,

वनक्षेत्र-वढोदा, रोपवाटीकेचे नाव-पिंप्रीपंचम,  तालुक्याचे नांव- मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ,

वनक्षेत्र -जळगाव, रोपवाटीकेचे नाव- वसंतवाडी,   तालुक्याचे नांव- जळगाव, जामनेर

वनक्षेत्र-मुक्ताईनगर, रोपवाटीकेचे नाव-निमखेडी,  तालुक्याचे नांव-भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड

वनक्षेत्र-मुक्ताईनगर, रोपवाटीकेचे नाव-साळसिंगी, तालुक्याचे नांव-भुसावळ, बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर

वनक्षेत्र- पारोळा, रोपवाटीकेचे नाव- वाघ्रा, रोपे पुरवठा होणाऱ्या तालुक्याचे नांव-अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा.

सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव अंतर्गत रोपवाटिकांचा तपशील
वनक्षेत्र तालुका चोपडा, रोपवाटीकेचे नांव-नारोद, बोदवड-साळसिंगी, रावेर-रावेर, यावल-यावल, खिरोदा, भडगाव-वलवाडी, भडगाव, पाचोरा-बिल्दी, भुसावळ-मुशाळतांडा, अमळनेर-पळसदरे, चाळीसगाव- बिलाखेड, जळगाव-मेहरुण, जामनेर-गंगापुरी, हिंगणे बु. एरंडोल-चोरटक्की, पारोळा-मोंढाळे. तरी सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, नागरिक व वृक्ष प्रेमी यांनी वन महोत्सव कालावधीतील सवलतीच्या दराचा लाभ घेऊन रोपे वरीलप्रमाणे रोपवाटीकेतून प्राप्त करुन वृक्ष लागवड करावी. असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

Protected Content