Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत तुकाराम जयंतीनिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम

अमळनेर प्रतिनिधी । संत तुकाराम जयंतीनिमित्त येथे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संत तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते मराठा मंगल कार्यालय येथे जमले होते. कार्यक्रमाचे संयोजक मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मनोहर पाटिल, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटिल, जिल्हा बँक संचालिका सौ.तिलोत्तमा ताई पाटिल, खा.शि.मंडळ उपाध्यक्षा सौ.माधुरी पाटिल, आदिंनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ.वसुंधरा लांडगे,सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटिल, सामाजिक कार्यकर्ते प्रा.लिलाधर पाटिल, गटशिक्षणाधिकारी अशोक बिर्‍हाडे, शिव बहुद्देशिय प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजित शिंदे आदिंनी जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्याचा परामर्श घेतांना तुकोबांरायांच्या अभंगांचे संदर्भ देत उपस्थितांचे प्रबोधन केले. दुष्काळातील शेतकर्‍यांचे कर्जाचे कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून कर्जमाफी देणारे पहिले महान पुरुष म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज होते असे प्रतिपादन तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मराठा मंगल कार्यालय येथे विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने असे विचारप्रबोधनात सांगण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय किसान मोर्चाचे कार्यकर्ते अरुण देशमुख सौ.रंजना देशमुख, पंचमआप्पा नागपूरकर आदिंनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन संजय पुनाजी पाटिल यांनी केले. सौ.अरुणा अलई यांनी यावेळी अभंग गायले.

याप्रसंगी नगरसेवक श्याम पाटील, पत्रकार चंद्रकांत काटे, किरण पाटिल,आदित्य बिल्डर्सचे प्रशांत निकम, विनोद कदम, सौ.विद्या हजारे, सौ.अपेक्षा पवार, सौ.रत्नप्रभा बिर्‍हाडे, सौ.वर्षा पाटिल, दशरथ लांडगे,रविंद्र पाटिल, संदिप खैरनार, किरण पाटिल, निवृत्त पोलीस निरीक्षक मधुकर बैसाणे, रावसाहेब निकम, सुभाष शिंगाने, युवा कार्यकर्ते मनोज शिंगाने आदिनीही प्रतिमा पूजन केले.तर युवा मित्र परिवाराचे राहुल पाटिल, गणेश भोई,राहुल अहिरराव, करण नेरकर,भूषण चौधरी,परेश पाटिल आदींसह समाजबांधव याप्रसंगी उपस्थित होते.

Exit mobile version