Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत सावता माळी युवक संघाच्या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

चोपडा प्रतिनिधी । श्री संत सावता माळी युवक संघातर्फे राज्यस्तरीय चित्रकलेसह अन्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली आद्यसंत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सप्ताह निमित्त श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे राज्यस्तरीय चित्रकला, मूर्ती,कॅलिग्राफी, स्केच, डिजीटल चित्रकला स्पर्धांचे आयोजन केलेले आहे
रविवार दि.१९ जुलै २०२० रोजी महाराष्ट्राचे आराध्यदैवत आद्यसंत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी आहे.त्या निमित्त राज्यस्तरीय चित्रकला, मूर्ती, स्केच,डिजीटल चित्रकला, कॅलिग्राफी स्पर्धा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी स्पर्धकांनी तयार केलेली श्री संत शिरोमणी सावता महाराज यांचे प्रसंगावर आधारित चित्र,मूर्ती, डिजीटल फोटो ,कॅलीग्राफी ,स्केच हे विष स्वरूपात santasawatamali@gmail.com या मेल आयडी वर १५ ऑगस्ट २०२० पर्यंत पाठवावा व सोबत स्पर्धकांचे नाव पत्ता मो.न.सह स्पर्धकांची संपूर्ण माहीती पाठवावी.

स्पर्धकांनी काढलेले श्री संत सावता महाराज यांचे प्रसंगावर आधारित चित्र, साकारलेली मूर्ती, डिजीटल चित्र सगळ्या पेक्षा उकृष्ठ असेल अश्या स्पर्धक यांना प्रथम, द्वितीय, तृतीय प्राप्त स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य तर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. संबंधीत कार्यक्रमाचे नियम हे श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या हाती असतील. कोणीही चित्रकला, मूर्ती, डिझिटल चित्र पाठवू शकतात. या स्पर्धेसाठी वयाची कुठलीही अट नाही. ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी आहे. तसेच सहभागी सर्व स्पर्धक यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. यात प्रथम पारीतोषीक- रोख रक्कम २१,१११; द्वितीय पारीतोषीक – रोख रक्कम ११,१११; तृतीय पारीतोषीक- रोख रक्कम ५५५५ अशी बक्षिसे असून सहभागी प्रत्येक स्पर्धकांना सन्मापत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कैलासराव शिंंदे करजगावकर, मोबाईल क्रमांक- ९५०३९९२७४०, समाधान माळी-९८३४४३६५८७, प्रसाद शिंदे– ९०७५१६१२१९ यांच्याशी आपण संपर्क साधू शकतात.

Exit mobile version