Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने कृष्णाजी मळ्यात भाविकांची गर्दी (व्हिडिओ)

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज अमोल सराफ  | श्री संत गजानन महाराजांचा १४४ वा प्रकट दिनाचे औचित्य साधत संत नगरीतील कृष्णाजींच्या मळ्यातही मोठ्या संख्येने गर्दी दिसून आली. संस्थांच्या वतीने याठिकाणी भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

या ठिकाणी दिवसभरात ५० हजाराच्या जवळपास भाविकांनी मळ्यात भेट देऊन दर्शन घेतले. येथील संस्थांच्या वतीने याठिकाणी १० हजार भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. विदर्भांची पंढरी असलेल्या संत नगरी शेगावात श्रीं च्या समाधीस्थळा व्यतिरिक्त गजानन महाराजांनी काही ढोंगी साधूंचे गर्व हरण केल्याचे ठिकाण ज्याचा श्री विजय ग्रंथात ८ व्या अध्यायात उल्लेख आहे अश्या कृष्णाजींचा मळ्यात हि श्रींचं प्रकटदिन निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. या ठिकाणी सामूहिक पारायणही पार पडले.

गजानन विजय ग्रंथाच्या ८ व्या अध्यायात उल्लेख असलेल्या कृष्णजींचा मळा म्हणजेच कृष्णाजी पाटील यांचा मळा काही महिन्यांपूर्वी भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. या ठिकाणी संत गजानन महाराजांचे मन उद्गिन्न झाल्याने काही दिवस विश्रांती साठी आल्या नंतर जळत्या पलंगावर बसून ब्रम्हगिरी गोसावी यांचे गर्व हरण केले होते. यामुळे विजय ग्रंथात या स्थानाला विशेष महत्व असून हे यामुळे येथील मंदिरात आता भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.काल नववर्षाच्या निमित्ताने या मंदिरात भाविकांनी या ठिकाणीही एकच गर्दी केली होती. अनेक भाविकांनी या ठिकाणी सामूहिक पारायणही पार पडले. अशी माहिती या संस्थानचे अध्यक्ष शैलेंद्र पाटील यांनी दिली.

 

 

Exit mobile version