Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत चर्चासत्र उत्साहत

भुसावळ प्रतिनिधी । जागतिक दूरसंचार दिनाचे औचित्य साधून संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाने चर्चासत्राचे आयोजन केले.

या चर्चासत्रात भुसावळ प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांच्यासह प्रा.डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा.धीरज अग्रवाल, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दीपक साकळे, प्रा.धीरज पाटील, नितीन पांगळे यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी प्राचार्य डॉ.सिंग म्हणाले की, देशाची मोठी लोकसंख्या आणि स्मार्टफोनचा वाढता प्रभाव पाहता भारतातील टेलिकॉम बाजारपेठ या क्षेत्रांसाठी जगातील सर्वांत मोठ्या बाजारपेठेपैकी एक आहे. परिणामी आरोग्यसेवा, शिक्षण, अर्थ, उद्योग, शेती आणि दळणवळण या क्षेत्रांना याचा मोठा लाभ होत असल्याचे डॉ.सिंग म्हणाले. लवकरच ५-जी तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटिलीजन्सवर प्राध्यापकांची कार्यशाळा होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. तर डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.

Exit mobile version