Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संकुल स्तरीय बास्केट बॉल स्पर्धेचा निरोप सभारंभ

jalgaon 2

भुसावळ प्रतिनिधी । येथील जवाहर नवोदय विदयालय साकेगाव जि. जळगाव गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संकुल स्तरीय बास्केट बॉल स्पर्धांचा आज दि. 25 जुलै रोजी निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.

कार्यक्रमाच्या अतिथी म्हणून ताप्ती पब्लीक स्कूलच्या प्रा. निना कटलार तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रा.आर.आर.खंडारे उपस्थित होत्या. या स्पर्धांमध्ये अकोला संकुलातील नांदेड, परभणी, वाशिम, अकोला, हिंगोली, जळगाव अशा सहा जिल्ह्यातील ज.न.वि.च्या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. या खेळाचे पंच म्हणून गोपाल जोनवाल, गिरीष खुशलाणी, विक्की तरटे, रुपेश तायडे, विजय पाटिल, विक्की तायडे व सहकारी पंचमंडळाने निःपक्षपातीपणे निर्णायक भुमिका पार पाडत यशस्वीरित्या सामन्यांचा निकाल लावण्यात आला. ज.न.वि.अकोला विजयी सर्व विजेत्या व उपविजेत्या संघांना ताप्ती पब्लीक स्कूलच्या प्रा. निना कटलार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.पी.पांडे यांनी तर विद्यालयाचे उपप्राचार्य पी.आर. कोसे सर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.

Exit mobile version