Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संज्याला रड्या ‘ऑफ द ईयर अवॉर्ड’ द्यायला पाहिजे : निलेश राणे

raut rane

 

मुंबई (वृत्तसंस्था) तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. २०१९ चा ‘रड्या ऑफ द ईयर अवार्ड’ संज्यालाच दिला पाहिजे, अशा एकेरी आणि जहरी शब्दात भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. २०१९ चा “रड्या ऑफ द ईयर अवार्ड” संज्यालाच दिला पाहिजे. मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे पण याचे राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच, असे ट्विटमध्ये निलेश यांनी म्हटलेय. दरम्यान, या अधिवेशनाला शिवसेनेच्या सर्व खासदारांची आसनव्यवस्था बदलून त्यांना विरोधीपक्षांच्या बाकावर स्थान देण्यात आले आहे. यामुळे संजय राऊत यांची राज्यसभेतील आसनव्यवस्थाही बदलण्यात आली आहे. याच विरोधात राऊत यांनी राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांना पत्र लिहिले होते.

Exit mobile version