Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता बाप दाखव…नाही तर श्राध्द कर : राऊतांचे सोमय्यांना आव्हान

मुंबई प्रतिनिधी । नाईक व ठाकरे कुटुंबांमध्ये जमीनीचे व्यवहार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर हल्लाबोल करत आता बाप दाखव…नाही तर श्राध्द कर ! असे आव्हान दिले आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबामध्ये जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. यानंतर ठाकरे कुटुंबावर अनेक भाजप नेत्यांनी टीका केली आहे. यातच अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरुन टीकास्त्र सोडले आहे. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून आता खासदार संजय राऊत यांनी आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा शब्दांत किरीट सोमय्या यांना सुनावलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अन्वय नाईक यांच्याशी २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

Exit mobile version