Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भावाला मंत्रिमंडळातून वगळल्याने संजय राऊत नाराज

sanjay raut

मुंबई, वृत्तसंस्था | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. तिन्ही पक्षातील नेते आणि आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असून, मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेक इच्छुकांचा पत्ताही कापण्यात आला आहे. यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या भावाचेही नाव असून, त्यामुळे खा. राऊत मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एका महिन्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. गेला महिनाभरापासून सहा मंत्रीच राज्याचा कारभार हाकत होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी करणार ? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केला जात होता. अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत असताना अनेकांच्या मंत्री होण्याचा ईच्छा अपुरीच राहिली आहे.

तिन्ही पक्षातील अनेक नेते आणि आमदारांची नावे मंत्रीपदाच्या शर्यतीत होती. पण, ऐनवेळी त्यांच्या नावांना कात्रीत लावण्यात आल्याचे समोर आले आहे. यात एक नाव शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या भावाचेही आहे. आमदार सुनील राऊत यांचा मंत्रिमंडळ विस्तारावेळी मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची चर्चा होती. संभाव्य यादीतही त्यांचे नाव असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. पण, शिवसेनेच्या मंत्र्यांच्या यादीतून ऐनवेळी वगळण्यात आले आहे.

राऊत यांनी केले होते प्रयत्न
शिवसेनेकडून आमदार सुनील राऊत यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे खासदार संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात घेण्यात यावे, यासाठी राऊत यांनी प्रयत्न केले होते. पण, पक्षाने त्यांना बाजूला ठेवले, असे बोलले जात आहे.

Exit mobile version